27-10-2023
देवा तुझ्या गाभार्याला उंबराच नाही
उंबरठा नसणे म्हणजे असीम, अनंत, अमर्याद होणे. असा केवळ भगवंत आहे अन् त्याच्या एकांतिक भक्तीने केवळ भक्तच या अनुभवाचा होत असतो. मन बुद्धी,विचार, कल्पना , संस्कार, समज, मान्यता या साऱ्या मानसिकतेच्याही पलीकडे पोचणे म्हणजेच सूक्ष्माहून सूक्ष्म होणे अन् व्यापकाहून व्यापक होणे. या स्थितीला उंबरठा नसणे म्हणतात नाही का? नाहीतर मांजर आडवी गेली, कोणी शिंकला, तीन तिघडा काम बिघडा असे मानसिक विविध उंबरठे घेऊन कारागृहात जगणारे खूप असतात, भक्ती मात्र छलांग मारते अन् भगवंताचे करून ठेवते. असेच काहीसे पाहूया, ऐकु ,या एपिसोड मधून.
---
Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message