देवाच्या या आनंदाचे –
सर्वसाधारपणे आपण सारेच, काहीतरी करून आनंद घेत असतो . कुणी आवडीचे पहातो, कुणी खातो कुणी ऐकतो, कुणी स्पर्श करून तर कुणी गंध घेऊन आनंद अनुभवत असतो. म्हणजेच आनंदासाठी कृती आवश्यक आहे. पण माझ्या सद्गुरूना न्याहाळतांना एक शोध लागला की त्यांची हरेक कृती आंतरिक आनंदातून उद्भवत आहे. आनंद ही त्यांची कायम स्थिति आहे. या सहज स्थितीतून त्यांची कृती घडत आहे. काही करून ते आनंद घेत आहेत असे नाही त्यांच्या बाबतीत. आज काहीसा असाच फील येतोय मला. तोच प्रकट होत आहे या एपिसोड मधून.