ठेविले अनंते तैसेची रहावे –
वास्तविक ज्याने मला ठेवले आहे तो अनंत कोण ? हा जो मला ठेवणारा अनंत, तो मुळात कसा आहे ? त्याला मी कसे रहावे हे आभिप्रेत आहे? हे सारे प्रश्न भविकाला पडत नसतील पण भक्ताला मात्र पडतात हे खरे? किंबहुना ज्याला पडतात तोच भाविक भक्त होण्याची शक्यता असते. भक्ताचे प्रश्न केवळ कुतुहल वा जिज्ञासा एवढ्या पुरते नसतात. भक्ताचे प्रश्न पडत नाहीत तर कायमचे समोर उभे रहातात ठामपणे अन भक्ताला भक्तीच्या दिशेनं पुढे नेत असतात ध्यासापोटी. हा ध्यास प्रकट होत आहे या एपिसोडमधून