कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी – परमभक्त श्री संत सावतामाळी यांचेकडून केवळ भक्तीच्या आवेगातून हे आनंदाचे उद्गार प्रकट होत आहेत. भक्ति हेच जिवन अन जीवन हीच भक्ति या आंतरिक अनुभवाची ते जणू ग्वाहीच देत आहेत. डोळ्यांनी कांदा, मुळा, भाजीपाला, लसूण मिरची कोथिंबीरच पहात आहेत ते, पण दृष्टीला दिसते काय तर अवघी विठाई, अवघा श्रीहरी. अवघा झाला माझा हरी. जर भगवंत अवघा भक्ताच्या अनुभवाचा होतो तसा भक्तही अवघा भगवंताचा होत. भक्ति काही तुकड्या तुकड्यांची नसते. सलग अन सातत्याची असते. भक्तीला टक्केवारी नसतेच मुळी. भक्ति केवळ पूर्ण नाही तर संपूर्ण असते. तेव्हा संत श्री सावता माळी यांच्या मळ्यात उगवून कांदा, मुळा, भाजी आलीय पण हृदयात मात्र ही विठाई ,हा श्रीहरी खेळतोय. चला तर, हा भक्तीचा मळा पाहूया आपण.
魔女とカメレオン
二万年生きている魔女で占い師のまほさんと、自由人で何でも屋のうえちゃん