सुखाचे हे सुखं श्रीहरी मुखं- पांडुरंगाचे परमभक्त श्री संत नामदेव महाराज यांचे हे उद्गार आहेत. सुख म्हणजे आपणा सर्वांना कळते.त्यासाठी देवाकडे आपण दुख: नको , सुखं हवे अशी वारंवार प्रार्थना करतो. पण नामदेव महाराज सुख न म्हणता सुखाचे सुख म्हणत आहेत. हे सुखाचेही सुख म्हणजे काय हो ? सुखालाही सुखी करणारे असे काय आहे? तर श्रीहरी मुख. जसे ज्ञानेश्वर माऊली म्हणते. आम्ही प्रसन्नतेच्या मागे नाही लागलो पण प्रसन्नता अमूची वेडी झाली, त्याला आम्ही काय करणार? “निवृत्तींनाथा, लागली तुमची ऐसी गोडी, तेणे प्रसन्नता जाहली अमूची वेडी “ अगदी असेच संत नामदेव महाराज सांगत तर नाहीत ना? इथे सर्वच सुखांचे मूळ, जिथे सुखही नाही दुख:ही नाही तर केवळ प्रगाढ शांती समाधान आनंदाचे अस्तित्व अनुभवास येते असे हे श्रीहरी मुखं संत नामदेव महाराज अनुभवत आहेत. या अनुभवाचे नेमकेपण काहीसे या एपिसोड मधून प्रकट होत आहे.