येतो तो तो क्षण अमृताचा - असा कोणता क्षण आहे का, जो अमृत घेऊन येतो ? क्षण , हे असं काही भांडं आहे ज्यातून अमृत देता घेता येतं? तेव्हा प्रचलीत असलेल्या किवा प्रचलित नसलेल्या कोणत्याही भाषेतून मूळ सत्य प्रकट होऊ शकत नाही. मुळात "क्षण म्हणून काही नाही " असे म्हणण्यापेक्षा "मी आहे" या जाणिवेचा हुंकार म्हणजेच क्षण. तेव्हा क्षण अमृताचे नसतात. जसा सिनेमागृहातला पडदा कॉमेडी, क्रिमिनल, सस्पेन्स, गूढ, थ्रिलर, रोमांटिकक नसतो , त्यावरचे चित्र, प्रतिबिंब तसे असते. पडदा कायमचा अस्तित्वात असतो अगदी शुभ्रतेने. सिनेमगृह चालू असो बंद असो . पडदा येत नाही जात नाही चित्राप्रमाणे. याला मी मूळ अस्तित्वाची शुद्ध बुद्ध गुणवत्ता म्हणतो. ती जेव्हा साधली जाते तेव्हा येणारे जाणारे सारेच क्षणभंगुर ठरते. मूळ अस्तित्व अमृता प्रमाणे कायम स्वरूपी असते. या जाणिवेने देहरूपात असलेला भक्त म्हणतो " येतो तो तो क्षण अमृताचा ---- "