जिणे मस्त मधुर - मस्त अन मधुर जगणे केवळ भक्ताचेच असते. कारण सदासर्वदा तो मधुराभक्तीतच असतो. ही त्याची रीयालिटि असते. वास्तवता असते. यामुळेच तो सदा मत्त असतो. या कैफातच असतो. माणूस खरे तर या अलौकिक धुंदीचीच अपेक्षा करतो. सर्वसामान्य मानसिकतेतून ही जेव्हा उपलब्ध होत नाही तेव्हा दुख: विसरण्यासाठी किवा तथाकथित सुखासाठी तो मादक पदार्थांचा आश्रय घेतो. खरेतर या कृतीने तो अचेतन असल्याचेच सिद्ध करत असतो. वास्तविक मूल ऊर्जेशी त्याची फारकत झालेली असते. ओरिजिनल ऊर्जा म्हणा चेतना म्हणा, भगवंत परमेश्वर म्हणा, या जाणिवेचा होणे हेच तर मानवी जीवनाचे प्रयोजन आहे. किंबहुना ही ऊर्जा जी येत नाही जात नाही. सदा सर्वदा असीमतेने भरभरून आहे ती ऊर्जा म्हणजेच भक्ताचे वास्तव असते. म्हणूनच तो भक्त गातो " जिणे मस्त मधुर, जिणे मस्त मधुर ". तर चला ऐकू या हा एपिसोड.